Episode 4: आम्ही विकल्पग्रस्त

Episode 4: आम्ही विकल्पग्रस्त

Omkar Phatak's show

04/08/2019 3:27PM

Episode Synopsis "Episode 4: आम्ही विकल्पग्रस्त"

आम्ही विकल्पग्रस्त आजच्या काळातील मानवाची मुख्य समस्या त्याची "विकल्पग्रस्तता" आहे. अन्न, वस्त्र, निवाऱ्याचे प्रश्न ज्यांच्या साठी सुटले अश्या ह्या मानवांची निर्णय क्षमता खुंटते आहे ती त्यांच्या पुढे ठाकलेल्या विकल्पांच्या त्सुनामी मुळे. अभूतपूर्व अश्या समृद्धीतून निर्माण झाले ते आयुष्य जगण्याचे अनेक विकल्प - जगणे म्हणजे अनंत अश्या विकल्पांमधून सतत निवड करत राहणे. काय खाऊ, काय नेसू, कसा दिसू, कसा बोलू, काय शिकू, काय करिअर करू, कुणाला जोडीदार म्हणून निवडू, कुणाशी नाते जोडू, कुठला फोटो फेसबुक वर टाकू, कुठला चॅनेल बघू, कुठले डाएट फोल्लो करू, कुठला हॉलिडे निवडू, हे घेऊ की ते घेऊ, सहन करू का पलट वार करू, commit करू की compromise करू.. माझा वेळ कुठे घालवू.. असे न संपणारे अनेक क्षुल्लक ते महत्वाचे निर्णय आणि त्या मागे बरोबर विकल्प न निवडल्याने काय होईल ह्याची भीती, त्यातून निर्माण होणारा स्ट्रेस आणि त्यातून ऱ्हास होत जाणारी निर्णय क्षमता हा आजचा सगळ्यात मोठा crisis आहे. ही भीती अनेक प्रकारे व्यक्त होते - you only live once (तुम्ही एकदाच जगता) - fear of missing out (निसटून जाण्याची भीती). किंबहुना, प्रत्येक क्षणी मी काय करतोय आणि माझ्या ह्या क्षणातील निर्णयामुळे मी काय करू शकलो नाही, कश्यापासून वंचित आहे, काय निसटून जातंय, काय शक्य झालं नाही ह्याची खंत ग्रासून टाकते आणि समोरचा क्षण निघून जातो. वर्तमानातील मुक्त विहार आणि आनंद सोडून भविष्यातील शक्यतांमध्येच आपण अडकून पडतो. असंतुष्टतेला प्रत्येक विकलपगणिक खतपाणी मिळत राहते. विकल्पांच्या ह्या अनंत साखळीमध्ये ग्रासलेले मन जेव्हा ठामपणे निर्णय घेऊ शकत नाही तेव्हा ते बळी पडते ते निर्णय क्षमतेचा आणि सर्वज्ञात असण्याचा आव आणणाऱ्या अश्या अनेक "external agencies" ना - ज्यांच्या हातात मग ते आपली धुरा देऊन टाकतात. When overwhelmed with choices and unable to decide, we go with the flow dictated by external agencies. ह्या external agencies मग विविध स्वरूपात समोर येतात - मग ती कधी market ने निर्माण केलेले एका आदर्श, uber-cool, स्वप्नवत आयुष्याचे, global किंवा local narrative असते , त्यांच्या कक्षेत सर्वात यशस्वी समजल्या जाणाऱ्या माणसाचं आयुष्य असते, त्यांची तुलना ज्यांच्याशी होते त्यांचा आदर्श, bollywood, hollywood, media, आई बापांच्या आकांक्षा, "peer pressure", status anxiety, पैसा, आणि प्रत्येकाच्या पूर्वाश्रमीच्या अनेक emotional आणि material deficiencies ना आता पुरेपूर भरून काढणे justify करणाऱ्या कुठल्याही narrative la ते निवडतात. पण समस्या अशी असते की ह्या insecurities ने drive केलेल्या externally-motivated narratives चा अंत शांतता आणि समाधानात होत नाही, भूक शमत नाहीच, पोट तर भरत नाहीच, किंबहुना भुकांचे प्रकार वाढतात आणि मग मृगजळाची प्रचिती होते. This is because there is no internal wholesome and true-to-your-nature guiding framework guiding these choices. वेळ निघून जाते एके दिवशी आणि मग विचार प्रकट होतो. एक perfect आयुष्या पेक्षा माझे हे समोर वाढलेले, unpredictable, uncertain, पण मनाशी resonate होणारे पर्याय मी का नकारावे असा प्रश्न पडतो. सहज जे मनात फुलतय, आकार घेतय, मनापासून करावेसे वाटते आहे ते का करू नये? Why not give Heart, gut, courage, intuition a chance and own the consequences whatever they may be? कदाचित विकल्पग्रस्ततेवर स्वार होऊन वाहवत जाण्यावर उपाय म्हणजे आपल्याला मनापासून भावणाऱ्या एका आव्हानामध्ये स्वतःला संपूर्णपणे झोकून देणे आहे, commit होणे आहे. May be that overarching purpose and our sacred commitment to what it takes is the anchor that we need to enjoy life and be deeply satiated in purely pursuing the path. - Omkar Phatak

Listen "Episode 4: आम्ही विकल्पग्रस्त"

More episodes of the podcast Omkar Phatak's show