6 October : आनंदी देव

06/10/2025 2 min
6 October : आनंदी देव

Listen "6 October : आनंदी देव"

Episode Synopsis

धन्यवादित (म्हणजें आनंदी) देवाच्या गौरवाची जी सुवार्ता मला सोपवलेली आहे तिला हे अनुसरून आहे. (1 तीमथ्य 1:10-11)



देवाच्या गौरवाचा एक प्रमुख पैलू म्हणजें त्याचा आनंद.



देव हा अपरिमित आनंदी नाहीं आणि तरीही अपरिमित असा गौरवी मात्र तो असू शकतो अशी कल्पनाहीं प्रेषित पौल करू शकत नव्हता. अपरिमित गौरवी असणं म्हणजें अपरिमित आनंदी असणं. त्यानें “धन्यवादित देवाच्या गौरवाची” ह्या वाक्प्रचाराचा उपयोग केला, कारण देव जितका आनंदी आहे तितका आनंदी असणें ही त्याचा बाबतींत एक गौरवशाली गोष्ट आहे - अपरिमित आनंदी.



देव आपल्या कल्पनेपलीकडे आनंदी आहे ह्या अनाकलनीय वस्तुस्थितीमध्येंच देवाचे  गौरव आहे.



ही सुवार्ता आहे : "धन्यवादित (म्हणजें पूर्णानंदी) देवाच्या गौरवाची सुवार्ता." हा बायबलमधूनच घेतलेला शास्त्र-संदर्भ आहे! देव गौरवीपणें आनंदी आहे हे शुभवृत्त आहे.



कोणीही मनुष्य एका दुःखी देवाबरोबर सर्वकाळ राहावयास पाहणार नाहीं. जर देव दु:खी असेल, तर सुवार्तेचे ध्येय हे आनंदाचे ध्येय नाहीं, म्हणजें ती मुळीच सुवार्ता नाहीं असाच त्याचा अर्थ होईल.



पण, खरे पाहतां, येशू आम्हाला एका आनंदी देवासोबतच सर्वकाळ राहण्यासाठीं बोलावितो जेव्हा तो म्हणतो, "तू आपल्या धन्याच्या आनंदात सहभागी हो" (मत्तय 25:23). येशू प्रकट झाला आणि मरण पावला ते यासाठीं कीं त्याचा आनंद - देवाचा आनंद - आम्हांमध्यें असावा आणि आमचा आनंद पूर्ण व्हावा (योहान 15:11; 17:13). म्हणून, सुवार्ता ही “आनंदी देवाच्या गौरवाची सुवार्ता” आहे.



देवाचा अपरिमित आनंद हा प्रामुख्याने त्याच्या पुत्रामध्यें असलेला त्याचा आनंद आहे. म्हणजें जेव्हा आपण देवाच्या आनंदात सहभागी होतो, तेव्हा आपण त्या आनंदात सहभागी होतो जो पित्याला त्याच्या पुत्राच्या ठायीं आहे.



ह्याच उद्देश्याने येशूनें पित्याचे नाव आपल्याला कळवलें आहे. योहान 17 मधील त्याच्या महान प्रार्थनेच्या शेवटी, तो आपल्या पित्याला म्हणाला, “मी तुझे नाव त्यांना कळवले आहे आणि कळवीन; ह्यासाठीं कीं, जी प्रीति तू माझ्यावर केलींस ती त्यांच्यामध्यें असावी आणि मी त्यांच्यामध्यें असावे” (योहान 17:26). त्यानें आम्हांला देवाचे नांव कळविले, जेणेंकरून त्याच्या पुत्रामध्यें असलेला देवाचा जो आनंद तोच आपल्यामध्येंही असावा आणि त्याच्यामध्यें आपला आनंद असावा.